अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर (ट्रस्ट) चे श्री महालक्ष्मी भक्त निवास हे श्री महालक्ष्मी मंदिराच्या जवळच आहे. यामध्ये सर्व सोयीनीयुक्त अटॅ रूम्स अत्यंत माफक शुल्कामध्ये भाविकांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय स्नानाचीही उत्तम सोय उपलब्ध आहे.
अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे रविवार दि. ६ जानेवारी २०१९ रोजी ना. चंद्रकांतदादा पाटील व महापौर सौ सरिता मोरे यांच्या उपस्थितीत ब्राह्मण सभेच्या श्री महालक्ष्मी भक्त निवासाचे नूतनीकरण उदघाटन, प्रा. डॉ. द. शं. आंबर्डेकर सभागृहाचे नामकरण व गुणगौरव समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या निमित्ताने पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून कोल्हापूरच्या महापौर सौ सरिता मोरे यांची उपस्थिती लाभली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर आपल्या उदघाटनपर भाषणात मा. ना. चंद्रकांतदादांनी ब्राह्मण सभेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ब्राह्मण समाजाशी माझे नाते खूप जवळचे आहे. मी ज्या समाजात जातो तीच माझी जात आहे. ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणाऱ्यांना भावी काळासाठी संस्थेचे किमान ५ कोटी निधी जमवावा व या समाजातील गरजूंना पेन्शन देण्यासाठी प्रयत्न करावेत. माझ्याकडूनही जमेल तेवढे सहकार्य केले जाईल असे मी आश्वासन देतो. ब्राहमण सभेचे नूतनीकरण केलेले भक्त निवास हि एक काळाची गरज असून अतिशय सुसज्ज असे भक्तनिवास केले आहे अशा शब्दात कौतुक केले.
कोल्हापूरच्या महापौर सौ सरिता मोरे यांनीही ब्राह्मण सभेने केलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.