ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आपण एकत्र येऊन आपल्या समाजाकरिता काहीतरी भरीव कार्य केले पाहिजे अशी भावना असे विचार १९४०-१९४१ या काळात बाळसे धरू लागले होते.त्यावेळी काही ब्राह्मण समाजातील अध्वर्यू व विद्वान विचारवंत, मंडळींनी समाज उन्नती व ज्ञातीचा उत्कर्ष व्हावा यासाठी वेदाभ्यास, नंदिनी सभा, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक सभा इत्यादी विविध ज्ञातीसाठी काही समाजाच्या कल्याणाचे उपक्रम राबवत होते. त्यात प्रामुख्याने कै. विश्वनाथराव गोखले, कै. रा ब. पंडितराव, वे. शा. सं. कै. बलाचार्य खुपेरकर शास्त्री, श्री वाकनीस सरदार इ. विद्वान मंडळीनी चालवलेली वेदाभ्यास नंदिनी सभा हि या शास्त्री पंडितांची परीक्षा घेणारे एक विद्यापीठच होते. आपण अधिक समाजाभिमुख झाले पाहिजे हि जाणीव उत्पन्न झाली व प्रथम समस्त ब्राह्मण समाज एका संघटनेखाली आणावयाचा व संघटीत करावयाचा प्रयत्न सुरु झाला. याच वेळी मुंबई गिरगाव ब्राह्मण सभेच्या प्रगतीशील कार्याची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.
read more